गोंदिया जिल्ह्यातील सौंदड गावात ग्रामपंचायतीच्या वादामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी सरपंच व सदस्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु, आज सरपंच हर्ष मोदी आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केलं की, ग्रामपंचायत पारदर्शक पद्धतीने काम करत आहे आणि ग्रामविकासासाठी सर्वांनी एकत्र यावं. सरपंच मोदी यांनी म्हटलं की, जर खोटे आरोप पुन्हा करण्यात आले, तर अधिकृत तक्रार दाखल केली जाईल आणि कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन केला जाईल.












