कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. जनभावना तीव्र होत असून बीडच्या येळंब घाट मध्ये आणि इतर काही ठिकाणी माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी बॅनर लागले आहेत सेव्ह माधुरी ‘हत्तीन गेली हे दुःख आहे पण ती परत येणार हा आमचा निश्चय आहे’ अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. याचबरोबर अंबानींच्या सर्व प्रॉडक्ट्सवर बॅन आणि जिओ संदर्भात बायकॉट जिओ असा देखील बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.












