Sensex and Nifty Down : सोमवार 5 जानेवारी 2026 रोजी फ्लॅट सुरुवातीनंतर देशांतर्गत शेअर बाजार घसरणीला सामोरं जात आहे. सकाळच्या सुमारास 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 185.44 अंकांनी घसरुन 85,576.57 वर उघडला, तर निफ्टी 52.55 अंकांनी घसरुन 26,276 वर व्यवहार करत होता. मागील ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 85,762.01 वर आणि निफ्टी 26,328.55 वर बंद झाला. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.29 टक्क्यांनी वाढला, तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 0.02 टक्क्यांनी किंचित वाढला.
सेन्सेक्समध्ये नफा मिळवणारे शेअर्स :
सेन्सेक्समध्ये प्रमुख नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये बीईएल, एसबीआय, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स यांचा समावेश होता. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये बीईएलनं 0.98 टक्क्यांनी वाढ नोंदवत आघाडी घेतली. दुसरीकडे, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, ट्रेंट आणि टीसीएस लाल रंगात होते, एचसीएल टेक 1.36 टक्क्यांनी घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात, 1,184 निफ्टी शेअर्स हिरव्या रंगात होते, तर 1387 लाल रंगात होते. याशिवाय 115 शेअर्स अपरिवर्तित राहिले. (Sensex and Nifty Down)
रुपया 4 पैशांनी घसरुन 90.24 वर बंद :
व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळं निर्माण झालेल्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळं अमेरिकन चलनाची मागणी वाढल्यानं सोमवारी भारतीय रुपया 4 पैशांनी घसरुन 90.24 वर उघडला. फॉरेक्स व्यापाऱ्यांच्या मते, या भू-राजकीय घडामोडींमुळं रुपया आणखी घसरण्याची अपेक्षा आहे, जरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं काही दिलासा मिळू शकतो.
कोणते आहेत प्रमुख घटक :
आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया 90.21 वर उघडला आणि नंतर 90.24 वर आला. गेल्या शुक्रवारी, रुपया 22 पैशांनी घसरुन 90.20 वर बंद झाला. घसरणीची व्याप्ती जागतिक घटना आणि परकीय चलन बाजाराच्या परिणामांवर अवलंबून असेल, ज्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेसह भू-राजकीय परिस्थिती हे प्रमुख घटक आहेत.











