वाशिम जिल्ह्यातील अनसिंग ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातील नाल्याचे दूषित पाणी थेट ग्रामीण रुग्णालयात शिरले. यामुळे रुग्ण अडचणीत आहेत आणि पाणी बाहेर काढताना कर्मचाऱ्यांना दमछाक झाली आहे. मागील वर्षीही अशाच प्रकारची घटना घडली होती, मात्र प्रशासनाने उपाययोजना न केल्याने पुन्हा रुग्णालयात पाणी शिरले आहे. ग्रामपंचायतीच्या या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेली परिस्थिती नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.












