Share Market Closing : देशांतर्गत शेअर बाजारानं आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरु ठेवली. बुधवारी, बीएसई सेन्सेक्स 102.20 अंकांनी (0.12%) घसरुन 84,961.14 वर बंद झाला. एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 37.95 अंकांनी (0.14%) घसरुन 26,140.75 वर बंद झाला. आजच्या घसरणीदरम्यान, आयटी शेअर्समध्ये वाढ दिसून आली. यापूर्वी, सोमवार आणि मंगळवारी देखील बाजार तोट्यासह बंद झाला. काल, सेन्सेक्स 376.28 अंकांनी (0.44%) घसरुन 85,063.34 वर बंद झाला आणि निफ्टी 71.60 अंकांनी (0.27%) घसरुन 26,178.70 वर बंद झाला.
टाटा समूहाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी :
मंगळवारी, सेन्सेक्सच्या 30 पैकी 13 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 17 कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे, आज निफ्टी 50 पैकी 20 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात वधारले, तर उर्वरित 30 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात वधारले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा ग्रुपचा टायटन सर्वाधिक 3.96 टक्के वधारला, तर मारुती सुझुकीचा शेअर 2.78 टक्के घसरणीला बंद झाला.
आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ :
बुधवारी सेन्सेक्समधील इतर शेअर्सच्या कामगिरीबाबत, एचसीएल टेक 1.99 टक्के, टेक महिंद्रा 1.80 टक्के, इन्फोसिस 1.72 टक्के, सन फार्मा 1.27 टक्के, टीसीएस 1.23 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.07 टक्के, इटरनल 0.79 टक्के, एल अँड टी 0.64 टक्के, बीईएल 0.63 टक्के, ट्रेंट 0.30 टक्के आणि अॅक्सिस बँक 0.03 टक्के वधारले. (Share Market Closing)
कोणत्या शेअर्समुळं तोटा :
दुसरीकडे, पॉवर ग्रिडचे शेअर्स 1.66 टक्के, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स 1.50 टक्के, एचडीएफसी बँक 1.38 टक्के, एशियन पेंट्स 1.34 टक्के, टाटा स्टील 1.32 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 1.19 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 1.14 टक्के, भारती एअरटेल 1.04 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.97 टक्के, बजाज फायनान्स 0.83 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.61 टक्के, अदानी पोर्ट्स 0.56 टक्के, एनटीपीसी 0.56 टक्के, आयटीसी 0.32 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.25 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.24 टक्के आणि कोटक महिंद्रा बँक 0.15 टक्के घसरले.










