शिर्डी साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळालाय. साई संस्थानची नोंद प्रतिष्ठित ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून धार्मिक, सामाजिक आणि मानवसेवेतील संस्थानच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलीय. या जागतिक मान्यतेमुळे संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला असुन संस्थानच्या सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचा-यांच्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे.












