बीड जिल्हा रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे अपघात वॉर्डात आग लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आणि रुग्णांची एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. हा संपूर्ण प्रकार निदर्शनास आल्यानंतर कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सर्व रुग्णांना आणि नातेवाईकांना देखील रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णालयाचे काम पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे.












