श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी परळीतील वैद्यनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. यावेळी शिवनामाचा जयघोष करत भाविकांनी जल्लोष केला. श्रावण सोमवार निमित्त विविध धान्यांची शिवमुठ अर्पण करण्याचे महत्त्व आहे. आज दुसरा श्रावण सोमवार असल्याने भाविकांकडून वैद्यनाथाला तीळ अर्पण करत भाविक आपल्या इच्छित मनोकामना मागत असतात.












