धरण परिसरातून भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली असून दौंड शहरानजीकचा दशक्रिया घाट हा पाण्याखाली गेला आहे. तसेच येथील महादेव मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.












