पुण्यातील पर्वती परिसरात मुलाने आईची दारूसाठी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एका मुलाने केवळ आईने दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. आईला गंभीर दुखापत झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून आरोपी मुलगा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्याकडून हे कृत्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.












