जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील शिरुड नाका, शिवाजीनगर येथे आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरगुती वादातून भूषण कासार याने दारूच्या नशेत आपल्या 64 वर्षीय वडिलांचा, राजेंद्र दत्तात्रय कासार यांचा हातोड्याने वार करून खून केला. दारूचे व्यसन असलेल्या वडिलांनी घरातील तांब्याची भांडी विकल्याने मुलगा संतापला होता. या वादातूनच हत्येची घटना घडली. घटनास्थळी पोलीस दाखल असून अधिक तपास सुरू आहे.












