साताऱ्यातील माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीविरोधात आंदोलन भडकले. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत घालत मोर्चा काढून निवेदन देत अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडले. गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलक आमरण उपोषणाला बसले असून, टाटा पॉवरकडून न्याय, कायमस्वरूपी रोजगार, पगारवाढ आणि आरोग्यसुविधा या प्रमुख मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा करचे यांनी दिला आहे.












