दहीवीतील विद्यार्थ्याचा त्याच्याच शाळेतील ज्युनिअरने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, निदर्शने करण्यात आली.ही घटना अहमदाबादच्या खोखरा येथील सेव्हन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलच्या आवाराबाहेर घडली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलाला (Juvenile Act) अल्पवयीन कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीये.
काय आहे घटना ?
मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे स्कुलची घंटा वाजली.शाळा सुटल्यानंतर दहावीचा विद्यार्थी नयन आपली बॅग घेऊन घराकडे निघाला होता, तो शाळेच्या बाहेर पडताच आठवीतील एका ज्युनिअर आणि इतर काही मुलांनी त्याला घेरले.त्यानंतर त्यांच्यातील शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं आणि आठवीतील मुलाने नयनवर चाकूने वार केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नयन पोटावर हात ठेवून जखमी अवस्थेत शाळेच्या आत जाताना दिसत आहे.त्याला तातडीने मणिनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपी शाळेच्या मागच्या बाजूला पळून गेला. मात्र, शाळेच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिले आणि याची माहिती शाळा प्रशासन आणि पोलिसांना दिली.पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.यानंतर आज (20 ऑगस्ट ) रोजी संतप्त पालक आणि ABVP (आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या) कार्यकर्त्यांनी शाळेची तोडफोड केली, आणि शाळेच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला केला.यामुळे आंदोलन आधिकच चिघळलं होतं.












