देशाचे उद्याचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधमय झाल्याचे भीषण वास्तव चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी ते भंगाराम तळोधी या दरम्यानचा मुख्य मार्गावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात पाणी साचले असून याच मार्गांवरून विद्यार्थी ये-जा करतात. या मार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी वारंवार गावकऱ्यांनी केली. परंतु त्यांच्या या मागणीकडे आजतागायत गांभीर्याने बघितले गेले नाही. याचा फटका आता चिमुकल्या विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे.