पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ‘सुदर्शन चक्र’ मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. ही स्वदेशी शक्तिशाली शस्त्र प्रणाली देशातील सामरिक, नागरी आणि धार्मिक ठिकाणी संरक्षण कवच म्हणून काम करेल. मिशन सुदर्शन चक्र पुढील 10 वर्षांत तयार होईल आणि शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. सिस्टम संशोधन, विकास व उत्पादन भारतातच होईल, तरुणांच्या प्रतिभेचा उपयोग करून ‘प्लस-वन’ रणनीतीने अचूक संरक्षण प्रदान केले जाईल. असे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात नमूद केले.












