इंदापूरमध्ये जमिनीच्या वादावरून पूजा शिंदे नावाच्या युवतीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रशासकीय भवनाच्या परिसरात ध्वजारोहणाच्या वेळी ही घटना घडली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. युवतीने मागील दोन दिवसांपासून कुटुंबावरील अन्याय आणि जमीन लुटल्याचा आरोप करून प्रशासनाला आत्महत्येचा इशारा दिला होता. या घटनेनंतर पोलीस पुढील तपासणी करत आहेत.












