TCS मधून काढून टाकल्यानंतरही पगार न मिळाल्याने सौरभ मोरे या कर्मचाऱ्याने थेट पुण्यातील TCS कार्यालयासमोरच फुटपाथवर राहण्यास सुरुवात केली आहे. त्याने आपल्या बॅगेवर डोकं ठेवून झोपलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, बाजूला ठेवलेल्या हाताने लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, “29 जुलैपासून कार्यालयात रिपोर्ट केलं, पण ID सुरू नाही, आणि पगारही नाही. HR ला कळवलं तरी प्रतिसाद नाही.” FITE संघटनेने सौरभला पाठिंबा देत म्हटलं, “अशा परिस्थितीतही आवाज उठवणं धाडसी आहे, मात्र या प्रकरणी श्रम कार्यालयातही तक्रार दाखल करणं आवश्यक आहे.”












