नालासोपाऱ्यात IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून 16 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकॅडमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल दुबे असे शिक्षकांचे नाव असून, नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमधील शिक्षक आहे.












