अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने तिसरीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे. आरोपी शिक्षकाने जेवणाच्या सुट्टीमध्ये वर्गात बोलावून हे कृत्य केल्याचा आरोप आहे. दरम्यान, स्थानिकांकडून पीडित कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समोर आले आहे.












