भामरागडमधील एकलव्य शाळेतील चार शिक्षक पूरामुळे अडकल्याने दिल्लीत होणारी परीक्षा धोक्यात आली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षा जॅकेट घालवून त्यांना बोटीद्वारे पर्लकोटा नदीतून हेमलकसा येथे पोहोचवले, आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे शिक्षकांना परीक्षेसाठी वेळेवर दिल्लीला रवाना करता आले.












