सिंहगड रोड येथील उड्डाणपूल सुरु करण्यासाठी ठाकरे गटाने एक आगळंवेगळं आंदोलन केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री प्रकट व्हा …ॐ फट स्वाहा. म्हणत हे आंदोलन केले. आम्हाला सिंहगड रोड येथील उड्डाणपूल सुरु करून द्या नाही तर आम्ही नागरिकांसोबत मिळून उद्घाटन करू असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि पालकमंत्र्यांना दिला आहे.












