10th Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (State Board of Secondary Education) उद्या शुक्रवार २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा (Exams start from February 20) घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे १६.१५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी (16.15 lakh students registered) केली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा महाराष्ट्र मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांमध्ये घेतल्या जातील. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांसाठी बोर्डाने समुपदेशकांचे मोबाईल नंबर (Counselors’ mobile numbers) देखील शेअर केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी (Secretary Dr. Deepak Mali) यांनी दिली आहे.
माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षा महाराष्ट्रातील एकूण ५ हजार ११९ परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातील. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १८ मार्चला शेवटचा पेपर होणार आहे. कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठे पथक वाढवण्यावर भर दिला असल्याची त्यांनी सांगितले.
बोर्डाने समुपदेशकांची नियुक्ती केली
महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी बोर्डाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. राज्य बोर्ड आणि विभागीय कार्यालयांमध्ये हेल्पलाइन देखील प्रदान करण्यात आल्या आहेत.
बोर्डाने २७१ फ्लाइंग स्क्वॉड तयार केले
महाराष्ट्र बोर्डाने २७१ फ्लाइंग स्क्वॉड तयार केले आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित वर्तन करणाऱ्या कोणावरही कठोर कारवाई केली जाईल. परीक्षा केंद्रांवरील अनुचित पद्धती रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बोर्ड सदस्यांना आणि जिल्हास्तरीय सरकारी अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाने समुपदेशकांचे मोबाईल नंबर देखील शेअर केले आहेत, जे 9960644411, 7972573742, 9834084593, 9359978315, 8169202214, 9371661255, 7208429381, 7709156068, 8421150528, 9404783996 या प्रमाणे आहेत.












