Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • गावकऱ्याचा वाघाने घेतला बळी, मृतदेह अर्धा किलोमीटरपर्यंत नेला फरफटत
गुन्हा

गावकऱ्याचा वाघाने घेतला बळी, मृतदेह अर्धा किलोमीटरपर्यंत नेला फरफटत

Death of a Villager

Tiger Attack Villager : साकोली तालुक्यातील बांपेवाडा शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी (Gathering flowers) गेलेल्या एका गावकऱ्यावर वाघाने हल्ला (Tiger Attack) करून ठार केले. मृत वसंता मेश्राम सुमारास घडली. वसंता गणपत मेश्राम (५५) असे मृताचे (Death of a Villager) नाव असून, ते बांपेवाडा या गावातील रहिवासी आहेत. बांपेवाडा येथील बीट क्रमांक १४३ मध्ये ही घटना घडली.

हेही वाचा – पुण्यात बाणेर पोलिसांची ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 2 जण अटकेत, ८.७६ लाखांचा गांजा जप्त

वसंता मेश्राम आपल्या मुलीसह शेतात

सकाळच्या सुमारास वसंता मेश्राम आपल्या मुलीसह मोहफुले वेचण्याकरिता गावापासून काही अंतरावरील शेतशिवारात गेले होते. सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास त्यांनी, मी मागेहून येतो, असे सांगून त्यांनी मुलीला घराकडे परत पाठविले.

त्यानंतर ते टोपले घेऊन मोहफुले वेचण्याच्या कामी गुंतले. दरम्यान, सकाळपासून घरून निघालेले वसंत मेश्राम दुपार झाली तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांना काळजी वाटली. शंका आल्याने त्यांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांना कळविले.

प्रेतच अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आले

त्यामुळे मुलीसह नातेवाईक आणि गावकरी ते मोहफुले गोळा करीत असलेल्या झाडापर्यंत पोहोचले. मात्र तिथे टोपले अस्ताव्यस्त पडलेले आणि काही अंतरावर चपलाही दिसल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी बांपेवाडा ते आमगाव रोडपासून जंगलात अंदाजाने शोध घेतला असता, सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांचे प्रेतच अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आले.

गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळविताच अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृताचे शव विच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

अधिकारी घटनास्थळी पोहोचताच उफाळला तणाव

घटनास्थळावरून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेह फरपटत नेऊन उजव्या पायाचे लचके तोडलेले आढळले. हे दृश्य पाहून गावकरी संतापले. ही वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. विभागाचे पथक आल्यावर गावकरी आणि त्यांच्यात वादही झाला.

उपजीविकेसाठी तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी

मृत वसंता मेश्रम यांच्या पाश्चात आई, पत्नी, चार मुली असा आप्त परिवार असल्याने उपजीविकेसाठी तात्काळ मदत जाहीर करा आणि कुटुंबातील एकाला वनविभागात नोकरी द्या, अशी मागणी सर्वांनी लावून धरली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर हा तणाव निवळला.

वनविभागाने दिला १० लाखांचा धनादेश

वनविभागाने वसंता मेश्राम यांच्या परिवाराला तत्काळ २० हजार रुपयांची रोख मदत केली. तसेच शासकीय नियमाप्रमाणे २५ लाखांच्या मदतीमधून १० लाख रुपयांचा धनादेश रुग्णालयातच मृताच्या पत्नीकडे सोपविला.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts