जळगावात ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जनसंवाद मेळाव्यात विविध आदिवासी लाभार्थ्यांना योजना लाभ वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला 112 गावांचे सरपंच-उपसरपंच, ग्रामसेवक, विभाग प्रमुख, समाज कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












