पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 100% क्षमतेने भरले आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 117 टीएमसी असून, सध्या 116.99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे तिन्ही जिल्ह्यांच्या पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या गरजा पूर्ण होण्याची खात्री मिळाली आहे..












