उरमोडी धरण प्रकल्पाच्या कामांसाठी 3042.67 कोटी रुपयांच्या सुधारित तांत्रिक समितीच्या प्रस्तावास भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन संघटन यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती येवून, डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल.












