उत्तराखंड येथील धराली हे गाव मंगळवारी दुपारी ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 50 हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. यातून सुदैवाने बचावलेल्या 80 गावकऱ्यांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. या 80 गावकर्यांनी वेळीच गाव सोडल्यामुळे ते बचावले आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती पाहता राज्य सरकारने 20 कोटींच्या मदतीची मंजुरी दिली आहे. या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू आहे.












