जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट नेत्या व दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी आज भाजपात दाखल होत आहेत. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. वैशाली या विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी असून, 2024 च्या निवडणुकीत त्यांनी भावाविरोधात लढत राज्यभर चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक ताकद वाढेल, तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.












