धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. असे असताना आता उमरगा शहरात नवीनच प्रकार निदर्शनास आला आहे. उमरगा येथील नागरिकांना लागणार भाजीपाला गटारीच्या पाण्यात ठेवण्यात आला आहे. यामुळे उमरगेकरांचा आरोग्य धोक्यात आले आहे.
उमरगा शहरातील जुना सरकारी दवाखाना येथे पहाटे फळे व भाजीपाला यांचा लिलाव होतो. या लिलावात घेण्यात आलेला भाजीपाला हा गटारीतील पाण्यात ठेवला जातो. हाच भाजीपाला शहरातील नागरिकांना विकला जातो. गटारीतील पाणी हे दूषित असल्यामुळे जंतू व रोगराई हे फळे व भाजीपाल्याच्या माध्यमातून उमरगाकरांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे भविष्यात उमरगेकरांचा आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
वंचित आघाडी व संभाजी ब्रिगेड यांनी निवेदनामार्फत प्रशासनाला भाजीपाला व फळ मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी मागणी केली आहे. अन्यथा एक सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे. परंतु या गटारीतील भाजीपाल्यामुळे उमरगेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसण्याची भीती निर्माण होत आहे.












