वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे आयोजित मोतीबिंदू शिबिरात वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पंकज भोयर यांनी विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या, ज्यात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या ग्रामसेवकाला धमकी देण्याचे प्रकरण, मनसेकडून डान्सबारमध्ये तोडफोड आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्ट संदर्भात चर्चाही केली.












