वाशिम जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील त्रिवेणी संगम नदीवर 14 वर्षीय मयूर झंजाळ नदीत बुडत होता. तेव्हा 16 वर्षीय अंकुश सुरवाडेने धाडसाने नदीत उडी मारून मयूरला तात्काळ बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवलेले मयूरचे प्राण सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे. प्रशासन आणि स्थानिक लोकांकडूनही अंकुशची प्रशंसा होत आहे.












