वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मध्यरात्री रस्त्यांची पाहणी करताना निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. याच दरम्यान दत्तानी मॉलमधील दोन बार २.३० वाजेपर्यंत सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कारवाई न केल्याने आमदारांनी संताप व्यक्त करत घटनास्थळीच अधिकाऱ्यांना बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.












