हिंजवडीत पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका विवाहित पुरुषाचं 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब पत्नीला कळल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. बुधवारी पतीची प्रेयसी कामाच्या ठिकाणी असताना तिला “कुरिअर आलं आहे” या कारणाने बाहेर बोलावून घेण्यात आलं. तिथे वाद झाल्यानंतर पत्नी, तिचा मेहुणा आणि आईनं प्रेयसीला गाडीत बसवून मारहाण केली.
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, “पतीसोबत पुन्हा दिसल्यास जीव घेईन” असा दमही पत्नीने दिल्याचे पीडितेने सांगितले. पोलिसांनी आरोपींना समज दिली असून पुढील तपास सुरू आहे.