बुलढाण्याच्या चिखली येथे “देवा भाऊ लाडकी बहीण” या नावाने राज्यातील पहिली संपूर्ण महिला संचालक असलेली नागरी सहकारी पतसंस्था महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू झाली. केवळ महिला व मुलींसाठी कार्यरत असणाऱ्या या पतसंस्थेच्या उद्घाटनाला कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड व हजारो बहिणी उपस्थित होत्या.












