BJP wins 100 seats : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख आहे. आज अनेक उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. भाजपने बिनविरोध नगरसेवकांची सेंचुरी केली आहे. त्यामुळे राज्यात निवडणूकीपूर्वीच कमळ फुलले असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपचे राज्यभरात बिनविरोध १०० जिंकले आहेत. तर ३ नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.
कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक ४९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात – ४१, कोकणात -४, मराठवाडा -३, विदर्भ -३ असे एकूण १०० पेक्षा अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर ३ नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना भाजपने खुप विशेष घेतले आहे. या निवडणूक प्रचारासाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे केंद्रीय सचिव विनोद तावडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – ‘मनसे’सोबत जाण्यास वडेट्टीवार सकारात्मक, मग खोडा कोणाचा?
सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, लोकशाही पायदळी तुडवा
दादागिरी, गुंडगिरीकरून पैसा, दबावतंत्र आणि यंत्रणेचा वापर करून भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध झाले आहे. पोलीस बळाचा वापर करून, धामकावून निवडणूक बिनविरोध होत असेल आणि हे आम्ही बिनविरोध निवडून आल्याची पाठ थोपटून घेत असेल तर असेच होणार. सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, लोकशाही पायदळी तुडवा, असा सणसणीत टोला काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर लगावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक आई, भाऊ, मुलगा, बायको, वहिनी, दीर, जाऊ बिनविरोध निवडून आले आहे. भाजपचा मुख्यमंत्री असल्याने प्रचारात तर महिला पदाधिकारीने धमकी दिली आहे, मत द्या नाहीतर गाठ माझ्याशी आहे. विकास निधीची भाषा वापरली जात आहे. त्यामुळे जिथे निवडणुका होणार तिथे त्या पारदर्शक होणार का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक आई, भाऊ, मुलगा, बायको, वहिनी, दीर, जाऊ बिनविरोध निवडून आले आहे. दादागिरी, गुंडगिरी करून कुठे पैशाचे प्रलोभन दाखवून पोलिसी बळाचा वापर करून निवडणुका बिनविरोध केलेल्या आहेत.
लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. भाजपचा मुख्यमंत्री असल्याने… pic.twitter.com/hf6srIxaCm
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 22, 2025
जामनेर नगरपालिकेत भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध
जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. येथील नगराध्यक्षपदी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपच्या सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध झाले होते आता 10 नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत.
दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध
धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिका जिथे नगराध्यक्षसह भाजपचे 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. दोंडाईचा नगरपालिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं आहे.






