छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी चौकात एक रेकॉर्डवरील आरोपी धारदार शस्त्र हातात घेवुन दहशत घालत होता. या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून १ लाख ६ हजार रुपये किमितीचे ५ मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत. आकाशवाणी चौकात एक तरुण हातात हत्यार घेऊन दहशत निर्माण करत आहे. या घटनेची माहिती मिळताच आकाशवाणी चौकात पोहोचून हातात चाकू घेऊन फिरत असणा-या तरुणास मोठ्या शिताफीने पकडून पोलीस ठाण्यात आणले असता त्याच्या ताब्यातून एक चाकू व १ लाख ६ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत तर ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शना खाली वामन नागरे व मारोती गोरे यांनी केली आहे.












