फलटण तालुक्यातील सालपे गावच्या हद्दीत लोणंद-सातारा रस्त्यावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात ३१ वर्षीय युवक अक्षय चव्हाण याचा मृत्यू झाला. हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटारसायकलवर लोणंदहून साताऱ्याकडे जात असताना हॉटेल मल्हारजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. लोणंद पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.












