A political earthquake : २०२२ मध्ये राज्यात राजकीय भूकंप घडवून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची सत्त्ता नेस्तनाबूत करून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सत्ता काबीज केली होती. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप (political earthquake) झाला होता. त्या राजकीय भूकंपाचा दुसरा अंक एकनाथ शिंदे यांनी सुरु केलाय. आता पुन्हा एकदा शिंदे मातोश्रीला (matoshree) धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे यांचे निम्मे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मातोश्रीचे टेन्शन हाय झालेय. निम्मे खासदार यांच्यापैकी ४ खासदार पक्ष पक्षप्रवेशासाठी अतिशय सकारात्मक असल्याचे बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (narendra modi) यांची भेट घेतली. त्यात विकास कामांवर चर्चा न करता ठाकरे गटाचे कोणते खासदार आपल्या संपर्कात आहेत याची यादी त्यांनी सादर केल्याचे समजते. लोकसभा खासदारांच्या या संभाव्य पक्षबदलात कोणतेही कायदेशीर अडथळे येऊ नयेत, यासाठी कायदेशीर तरतुदींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे ही वाचा: राज्यात गारपीटचा यलो अलर्ट; शेतकरी हवालदिल
शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार
१.अरविंद सावंत – मुंबई दक्षिण २. अनिल देसाई – मुंबई दक्षिण मध्य ३. संजय दिना पाटील – मुंबई उत्तर-पूर्व ४. संजय देशमुख – यवतमाळ-वाशीम ५.नागेश बापूराव पाटील आष्टिकर – हिंगोली ६. संजय हरिभाऊ जाधव – परभणी ७. राजाभाऊ प्रकाश वाजे – नाशिक ८. भाऊसाहेब राजाराम वाकचौरे – शिर्डी ९. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – उस्मानाबाद (धाराशिव)
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार
१..डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे – कल्याण २. नरेश गणपत म्हस्के – ठाणे ३. रवींद्र दत्ताराम वायकर – मुंबई उत्तर-पश्चिम ४. श्रीरंग अप्पा चंदू बारणे – मावळ ५. प्रतापराव गणपतराव जाधव – बुलढाणा ६.संदीपनराव आसाराम भुमरे – औरंगाबाद ७.धैर्यशील संभाजीराव माने – हातकणंगले.
२०२२ ची पुनरावृत्ती होणार का?
संभाव्य खासदारांना पक्ष प्रवेशाबाबत कुठलीहि अडचण येउ नये म्हणून शिंदे यांनी कायदेशीर बाबींवर चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे मातोश्रीचे पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे. शिंदे यांनी टाकलेल्या डावापुढे ठाकरे कसे उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. २०२२ मधेही ४० आमदार व काही खासदार यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत ठाकरे यांना धक्का दिला होता. त्यावेळी राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. त्यावेळच्या पक्ष बदलासंदर्भात ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. परंतु त्या खटल्याची सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत चालली आहे. त्यामुळेही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलीय.












