things to discuss before marriage : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं एकत्र येणं नाही तर विचार, संस्कार, अपेक्षांचे मिलन आहे. म्हणूनच लग्नाच्या अगोदरच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मन मोकळे करणे हे गरजेचे असते. ज्यामुळे नातं अधिक मजबूत होईल आणि दीर्घकाळ टिकेल. परंतु आजकाल लग्न टिकवणं अत्यंत कठीण झाले आहे. अशावेळी नातं टिकवण्यासाठी काही गोष्टींवर बोलणे महत्त्वाचे असते. या सात गोष्टी कोणत्या जेणेकरून दोघांमध्ये होणारे गैरसमज टाळता येतील याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
पाठिंबा देण्याचं वचन तुम्ही पार्टनरला दिल्यास
प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एक ध्येय घेऊन चालत असतो. ते ध्येय टिकवण्यासाठी ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण अपार मेहनत घेत असतो. करिअर, व्यवसाय, प्रवास किंवा वैयक्तिक स्वप्न या सर्वांचा विचार प्रत्येक व्यक्ती करतो. तुम्ही लग्नापूर्वी आपल्या पार्टनरचे ध्येय, त्यांचे स्वप्न, त्यांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा या सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. आणि या सर्व गोष्टींना पाठिंबा देण्याचं वचन तुम्ही पार्टनरला दिल्यास नातं टिकू शकतं.
पैश्यांबाबतच्या सवयी
बऱ्याचदा लग्नापूर्वी किंवा लग्नाच्यानतर मेल पार्टनरला पैशांबद्दल बोलणं अयोग्य वाटतं. परंतु पैसे किंवा व्यवहाराबद्दल बोलणे अत्यंत अत्यावश्यक आहे. दोघांना असलेली खर्च करण्याची सवय, बचत धोरण आणि आर्थिक जबाबदाऱ्या याबद्दल तुम्ही चर्चा केल्यास भविष्यात होणारे मतभेद टळू शकतात. आणि लग्नानंतर सुखी आयुष्य जगता येऊ शकते.
कुटुंब
लग्नासोबतच कुटुंब हे अत्यंत महत्त्वाचा आहे. लग्नानंतर दोघांना देखील कुटुंबाशी जुळवून घ्यावे लागते. यामुळे एकमेकांच्या घरातील संस्कार, अपेक्षा, नातेसंबंध याविषयी अधिक बोलणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही लग्नाच्या अगोदरच या सर्व बाबींची चर्चा केल्यास फायदेशीर ठरेल.
जीवनशैली
लग्नपूर्वी पार्टनरची जीवनशैली आणि सवयी एकमेकांना माहिती होणे गरजेचे आहे. तुमच्या झोपायची वेळ, खाण्याची सवय, आरोग्याची काळजी किंवा सोशल मीडियाचा वापर यासारख्या लहान सहान गोष्टी भविष्यात मोठे विषय बनू शकतात. त्यामुळे सर्वात पहिले एकमेकांच्या दिनचर्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.
मतभेद हाताळणे
प्रत्येक नात्यांमध्ये वाद होत असतात. परंतु होणारे मतभेद कसे हाताळायचे हे तुम्हाला जमलं पाहिजे. जेणेकरून तुमचे नाते मजबूत होते. मतभेदानंतर तुम्हाला शांततेत चर्चा करता यायला हवी. जेणेकरून होणारे मतभेद हाताळता येतील.
कुटुंब नियोजानावर दोघांचे मत
लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याला भविष्याबद्दल किंवा मुल बाळ होऊ देण्याबद्दल विचारपूस केली जाते. बरेच जणांना लवकर मूलबाळ हवं असतं तर काहींना वेळ घ्यायचा असतो. या विषयावर स्पष्टपणे बोलणे गरजेचे असते जेणेकरून भविष्यात गैरसमज टळू शकतात.
दोघांची पर्सनल स्पेस (things to discuss before marriage)
लग्न म्हणजे एकत्र राहणं आलं तरीसुद्धा स्वतःची जागा स्वातंत्र्य कायम ठेवणं देखील महत्त्वाचा आहे. जर तुम्ही लग्न झाल्यानंतर एकमेकांवर विश्वास ठेवत असाल वैयक्तिक स्पेस एकमेकांना देत असाल तर तुमचं नातं दीर्घकाळ टिकल्याशिवाय राहणार नाही.
लग्न हा एक सुंदर प्रवास असून तो यशस्वी होण्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा असणं गरजेचं आहे. वर दिलेल्या सात गोष्टींबाबत तुम्ही संवाद साधून स्पष्टता आणि विश्वास निर्माण केला तर तुमचे वैवाहिक जीवन खरंच सुखी राहील.










