Top News

Chanakya Niti about respecting women : चुकूनही करू नका या महिलांचा अपमान, नाहीतर होईल अनर्थ

website 15 2

Chanakya Niti about respecting women : आचार्य चाणक्य म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. हे प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. प्रत्येक व्यक्तीला आचार्य चाणक्य यांच्यासारखे व्हावे वाटते. या सोबतच आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यामध्ये कधीच काही महिलांचा अपमान करू नये असं सांगितलं आहे. त्यानुसार आपण आज या नीती पाहणार आहोत.

आईची सेवा करा

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जो व्यक्ती आईची सेवा करतो, त्या व्यक्तीला कधीच कोणत्या संकटांचा सामना करताना अडचणी येत नाही. असे व्यक्ती स्वर्गात जातात. आईची सेवा करणे हे संपूर्ण देवतांची सेवा करण्यायोग्य आहे. त्यामुळे आईची सेवा करत रहा. यामुळे तुम्हाला चांगले फळ मिळत राहील. त्याचबरोबर कधीच आपल्या आईचा अपमान करू नका. आईचा अपमान केल्यास तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम्सला सामोरे जावे लागू शकते.

गुरुच्या पत्नीचा अपमान करू नये

कधीच कोणत्याही राजाच्या पत्नीचा आणि गुरूच्या पत्नीचा अपमान करू नये. या महिलांचा कधीही सन्मान करणे गरजेचे आहे. याप्रकारे आईची सेवा केली जाते त्याच प्रकारे या दोन्ही महिलांची सेवा करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडून चुकूनही यांचा अपमान होत असेल तर लगेच चूक कबूल करून माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर आचार्य चाणक्य म्हणतात, मित्राची पत्नी, वहिनी देखील आई समान असते. चुकूनही त्यांचा अपमान करू नये.

आईप्रमाणे सासूची देखील करा सेवा (Chanakya Niti about respecting women)

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पत्नीची आई किंवा पतीची आई म्हणजेच सासूबाई ही देखील एक आई असते. आपल्या आईप्रमाणे सासुबाईंची देखील सेवा केली पाहिजे. चुकूनही तुमच्या सासूचा अपमान करू नये, यामुळे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. ज्याप्रमाणे आपली आई असते त्याचप्रमाणे सासू देखील आईच असते. ज्याप्रमाणे आपल्या आईने आपल्याला सांभाळले आहे त्याचप्रमाणे सासूने देखील त्यांच्या मुलाला किंवा मुलीला सांभाळलेले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts