Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Drinking Water After Meal: जेवणानंतर पाणी किती आणि कधी प्यावे? जाणून घ्या आयुर्वेदानुसार योग्य वेळ आणि फायदे
Top News

Drinking Water After Meal: जेवणानंतर पाणी किती आणि कधी प्यावे? जाणून घ्या आयुर्वेदानुसार योग्य वेळ आणि फायदे

Ayurveda tips on drinking water after meals

Ayurveda Health Tips: जेवण आणि पाणी हे दोन्ही आपल्या आरोग्यसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. अनेकजण जेवताना पाणी पितात, तर काहीजण जेवणानंतर लगेच पाणी घेतात. मात्र, पाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण याबाबत अनेकनाच्या मनात गोंधळ असतो. त्यामुळे पाणी नेहमी कधी आणि किती प्रमाणात प्यावे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग, आजच्या या विशेष लेखातून याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार, जेवण आणि पाणी पिण्याचा वेळ पचन प्रक्रियेला एक महत्वाचा भाग मानला जातो. जर याची वेळ चुकीची असेल, तर पचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो. अनेक लोक जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पितात. तर काही लोक दिवसभर फार कमी प्रमाणात पाणी पितात. अशा सवयीमुळे पचनाच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे सतत पोट फुगणे किंवा भरल्यासारखे वाढणे, अपचन, गॅस या सारख्या समस्या उद्भवू शकतात.

अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण जास्त काळ या सवयी असल्यास पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे जेवण आणि पाणी पिण्यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे, जेणेकरून पचन व्यवस्थित होईल आणि अन्नातील पोषक घटक शरीराला योग्य प्रकारे मिळतील.

हे हि बातमी वाचा: महिला दिनानिमित्त ‘स्पेशल वन’ला गिफ्ट द्यायच आहे? मग ‘हे’ बजेट फ्रेंडली 5 वस्तू बघाच!

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ

आयुर्वेदात पाणी पिण्याच्या वेळेला खूप महत्त्व दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, जेवताना जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळावे. गरज असल्यास जेवताना फक्त थोडेसे कोमट पाणी घेणे योग्य मानले जाते.

तसेच, जेवण केल्यानंतर साधारण ३० मिनिटांनी पाणी पिणे पचनासाठी फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते आणि अन्न योग्य प्रकारे पचण्यास मदत होते.

याशिवाय जेवणाच्या सुमारे ३० मिनिटे आधी पाणी पिणे देखील चांगले मानले जाते. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि भूक योग्य प्रमाणात लागते.

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे

जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिण्याची सवय काही समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

  • पचनक्रिया मंदावू शकते
  • पोटात वायू किंवा जडपणा जाणवू शकतो
  • अपचन आणि पित्ताची समस्या वाढू शकते

असे मानले जाते की जेवणानंतर लगेच जास्त पाणी घेतल्यास पोटातील पाचक रस पातळ होतात, त्यामुळे अन्न पचण्यास वेळ लागतो.

पाणी किती प्रमाणात प्यावे?

दररोज शरीराला पुरेसे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणपणे दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. मात्र हे प्रमाण व्यक्तीच्या शरीररचना, हवामान आणि शारीरिक हालचालींवरही अवलंबून असते.

पाणी एकदम जास्त पिण्यापेक्षा दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात पिणे अधिक फायदेशीर ठरते.

  • चांगल्या पचनासाठी या सवयी ठेवा
  • जेवण हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा
  • जेवताना खूप थंड पाणी टाळा
  • नियमित व्यायाम करा
  • पुरेशी झोप घ्या
img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts