Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणार नाही वापरा हे आयुर्वेदिक फेस सिरम
लाईफस्टाईल

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणार नाही वापरा हे आयुर्वेदिक फेस सिरम

Ayurvedic face serum for dry skin : हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते कारण या काळात हवेतला कोरडेपणा वाढतो आणि कमी आद्रता आणि गरम पाण्याचा वापर केल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. यामुळे त्वचा कोरडी पडते, निस्तेज दिसू लागते, यासाठी उपाय म्हणून तुम्ही क्रीम किंवा लोशन चा वापर केला तर ओलावा फार काळ राहत नाही आणि पुन्हा त्वचा कोरडी दिसायला लागते. आता यावर एक आयुर्वेदिक सिरम वरदान ठरू शकते. ते कसं जाणून घेऊया

हिवाळ्यात थंड हवेमुळे वातावरणातील आद्रता ही कमी होते. यामुळे त्वचेच्या वरच्या थरातील ओलावा हा निघून जातो आणि आपण गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल देखील नष्ट होते. या सर्व कारणांमुळे त्वचा ताणल्यासारखी वाटते आणि ओठ फाटतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दिसू लागतात. यामुळे आयुर्वेदिक फेस सिरमचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

आयुर्वेदीक फेस सिरम हे त्वचेची निगा राखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण हे सिरम फक्त नैसर्गिक घटकांनी बनलेले अजून ते त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करतात. आणि नैसर्गिक तेज परत आणतात. साधारणतः सिरम हा त्वचेला डीप न्यूट्रिशन देते. सिरम म्हणजे एक हलका आणि प्रभावी ड्रॉप असतो. हे आयुर्वेदिक फेस सिरम वनस्पती तेल आणि औषधी अर्क यांच्या संयोगातून तयार केले जाते. त्यामुळे कोणत्याही रसायन आणि कृत्रिम सुगंधाचा वापर न केल्यामुळे ते त्वचेच्या आत शोषले जातात आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा लवचिकता आणि चमक देतात.

हिवाळ्यात का आहे फायदेशीर

हिवाळ्यात क्रीम आणि लोशन जास्त काळ चेहरा मॉइश्चराईज ठेवू शकत नाही. त्यामुळे क्रीम किंवा लोशन पेक्षा सिरम नेहमीच फायदेशीर असते. कारण सिरम हे त्वचेत खोलवर पोहोचते. आणि त्वचा दिवसभर मऊ आणि ओलसर राहते. याशिवाय आयुर्वेदिक सिरम मध्ये बादाम तेल, केशर, चंदन यासारख्या घटकांचा समावेश असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. आणि चेहऱ्यावर हिवाळ्यात येणारा कोरडेपणा निघून जातो. आयुर्वेदिक सिरममध्ये असलेले आयुर्वेदिक घटक हे रक्तप्रवाह सुरळीत करतात आणि त्वचेची पुनर्निर्मिती करतात.

आयुर्वेदिक सिरममध्ये असलेले घटक आणि त्यांचे फायदे

केशर – त्वचेचा टोन सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक उजळपणा आणण्यासाठी केशर फायदेशीर आहे.

चंदन – चंदन मुळे त्वचेला थंडावा आणि मऊपणा मिळतो.

हळद – अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

बदाम तेल – हिवाळा त्वचेला डीहायड्रेशन आणि व्हिटॅमिन ई प्रदान करण्यासाठी बदाम तेलाचा वापर करतात.

गुलाब अर्क – त्वचेला ताजतवाने ठेवण्यासाठी आणि फोर्स घट्ट करण्यासाठी गुलाब अर्काचा वापर होतो.

असा करा वापर Ayurvedic face serum for dry skin

हे आयुर्वेदिक सिरम वापरण्यासाठी सर्वात पहिले चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर मऊ आणि चांगल्या टॉवेलचा वापर करून चेहरा कोरडा करा. आयुर्वेदिक फेस सिरम चे दोन ते तीन थेंब हातावर घ्या. आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर आणि मानेला मसाज करा. याचा वापर सकाळी आणि रात्री झोपायच्या पूर्वी करा. त्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर केल्यास परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतो.

याशिवाय फक्त आयुर्वेदिक सिरम वापरून परिणाम दिसणार नाहीत तर त्यासाठी त्वचेची आतून काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे दररोज कोमट पाणी आणि लिंबू आणि मधाचे सेवन करा. तुमच्या आहारामध्ये तू, बदाम आणि हळदीचा समावेश करा. झोप पूर्णपणे घ्या आणि तणाव टाळा. दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्या. जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक तेल संतुलित राहील आणि सिरमचा परिणाम सुद्धा अधिक काळ टिकेल.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts