Bad Habits Affect Health : आपण आपल्या दैनंदिन जीवनात एक नियमबद्ध रुटीन ठरवून घेतलेले असते. या रुटीन नुसार कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे आपण ठरवतो. आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करतो. परंतु या नियोजनामुळे अनेकदा आपण चुकीच्या सवयी आत्मसात करतो. परंतु त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर निर्माण होतो. जसे कि आपण रोज बाथरूम मध्ये करत असलेल्या चुका. या चुका आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
दैनंदिन आपल्या सवयींमुळे होणाऱ्या या चुका मोठ्या नसून सर्वसामान्य आहे.या सवयीचा आपण कधी विचारच करत नाही. कारण आपल्याला माहिती नसते कि, या सवयी चुकीच्या आहे. परंतु त्या हळूहळू आपली त्वचा, पचनसंस्था आणि आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आपण काही सवयी मोडणे गरजेचे असते. जाणून घेऊया कोणत्या आहेत बाथरूम मधील आपल्या वाईट सवयी.
1 टूथपेस्ट चा जास्त वापर
तुम्ही ब्रश करण्यासाठी जास्त टूथपेस्ट चा वापर करत असाल तर थांबा. आपल्या दातांसाठी फक्त एक ड्रॉप टुथपेस्ट गरजेचं असतो. परंतु ब्रश भरून टुथपेस्ट वापरण्याची सवय हानिकारक ठरू शकते. जास्त टुथपेस्ट वापरल्यामुळे दात जास्त स्वच्छ होत नाही तर दातांवर असलेला फ्लोराईडचा थर झिजतो. आणि दात जास्त संवेदनशील होतात. ब्रश केल्यानंतर लगेच तोंड धुणे ही सवय देखील घातक आहे. ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. लगेच तोंड धुतल्यामुळे टूथपेस्ट मध्ये असलेले फ्लोराईड निघून जाते. त्यामुळे तुम्ही ब्रश केल्यानंतर काही वेळ तसेच ठेवणे फायदेशीर ठरते.
2 जास्त साबण लावून हात धुणे
काही व्यक्तींना जास्तवेळ हात धुण्याची सवय असते. आणि खास करून जास्त साबण वापरण्याची. जास्त साबण अति स्वच्छता हि कन्सेप्ट पूर्णपणे चूक आहे. आपण हात धुण्यासाठी जास्त साबण वापरात असू तर आपली त्वचा कोरडी पडते. आपल्या हातावर भेगा पडू शकतात. आणि हातावरील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे कमी साबण वापरणे फायदेशीर ठरते.
3 केसांच्या टोकाला शाम्पू लावणे
केस धुताना बरेच जण केसांच्या टोकाला शाम्पू लावता. त्यामुळे केस कोरडे आणि रुखट दिसतात. अनेकदा तर यामुळे केस तुटण्याचे प्रकार देखील घडतात. नेहमी केसांच्या टोकाला नाही तर केसांच्या मुळांवर म्हणजे स्काल्प वर शाम्पू लावा. म्हणजे स्कॅल्प स्वच्छ होईल.
4 ओल्या केसांवर कंगवा फिरवणे
अनेक जण केस धुतल्यानंतर लगेच ओल्या केसांवर कंगवा फिरवतात. परंतु हे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. कारण ओले केस हे नाजूक असतात. ते लगेच तुटण्याची शक्यता असते. नेहमी केस धुतल्यानंतर ते अर्धवट सुकल्यानंतर विंचरणे योग्य ठरते. तसेच केसांसाठी रुंद दातांचा कंगवा वापरणे नेहमी चांगले असते.
5 ओला टॉवेल
तुम्ही एकदा वापरलेला टॉवेल पुन्हा वापरात असाल तर त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ओलसर टॉवेल मध्ये जंतू बॅक्टेरिया असतात. त्यामुळे शरीरावर पुरळ , खाज येऊ शकते. बऱ्याचदा तर इतरांचा वापरलेला टॉवेल असेल तर संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे कधीही कोरडा टॉवेल वापरा. ओला टॉवेल सुकवुनच वापरा.
6 टॉयलेट ब्रश
तुम्ही टॉयलेट क्लीन करण्यासाठी वापरत असलेला ब्रश साफ करणे गरजेचे असते. या टॉयलेट ब्रशवर जंतूंचा मोठा साठा असतो. अनेकजण टॉयलेट ब्रश साफ न करता वारंवार तोच वापरतात. परंतु यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नेहमी टॉयलेट ब्रश स्वच्छ करणे गरजेचे आहे.
7 टॉयलेट पेपरचा अधिक वापर
जर तुम्ही टॉयलेट पेपरचा वापर अधिक प्रमाणात करत असाल तर हे देखील धोकायदायक आहे. टॉयलेट पेपरचा वापर त्वचेला इरिटेशन देतो. त्यामुळे रेड रॅशेस देखील होऊ शकतात. म्हणून कमी प्रमाणात टॉयलेट पेपरचा वापर करण्यास प्राधान्य द्या.
8 परफ्युम कपड्यावर मारणे
बरेच जण परफ्युम कपड्यांवर मारतात. परंतु यामुळे कपड्यांवर डाग पडतात. आणि सुगंध जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे नेहमी परफ्युम पल्स पॉइंटवर, मान, मनगट किंवा कानामागे मारणे फायदेशीर ठरते.












