Diwali Bhai Dooj Shubh Muhurat २०२५ : दिवाळीत भाऊ बहिणीच्या अतूट नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे भाऊबीज. या भाऊबीजला बहिण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते. आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना करते. यंदा भाऊबीज साजरा करण्याचा शुभ मुहूर्त माहिती आहे का? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त आणि भाऊबीज साजरा करण्यामागील एक छोटीशी पौराणिक कथा :
यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी आहे. कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीय तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यंदा भाऊबीज साजरी करण्याचा मुहूर्त 22 ऑक्टोबर रोजी रात्री 08:16 वाजल्या पासून सुरु होणार असून 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10:46 वाजता ही तिथी समाप्त होणार आहे. 23 ऑक्टोबरला गुरुवारी दुपारी 01:32 वाजेपासून ते दुपारी 03:51 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या कालावधीदरम्यान भाऊबीज साजरी करता येऊ शकते.
अभिजीत मुहूर्त – सकाळी 11.59 ते दुपारी 12.46 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त – 2.18 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत
निशिता मुहूर्त – 11.50 ते उत्तररात्री 12.48 म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंत
View this post on Instagram
या पद्धतीने करा पूजा
भाऊबीजेच्या दिवशी आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर भावाला बसण्यासाठी स्वच्छ ठिकाणी पाट मांडावा, किंवा आसन टाकावे. त्याभोवती रांगोळी काढावी, भावाच्या कपाळावर टिका-अक्षता लावून औक्षण करून त्याला मिठाई भरवावी, भावाला नारळ किंवा केळीला कडदोरा बांधून बत्ताशे द्यावे. आणि भावाच्या प्रगती, सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करावी
हे हि वाचा : नोव्हेंबर महिना या ५ राशींसाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या तुम्हीही आहात का लकी
भाऊबीज सणाची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार भाऊबीज या सणाला यमद्वितीया असेही नाव आहे. आपण दिवाळीत साजरा करतो त्या भाऊबीज ची कहाणी सूर्यपुत्री यमुना आणि सूर्यपुत्र यम देवेतेशी संबंधित आहे. सूर्यपुत्री यमुना देवी आणि सूर्यपुत्र यम बहिण भाऊ होते. दोघांचा एकमेकांवर प्रचंड जीव होता. सूर्यपुत्री यमुना देवींनी बऱ्याचदा भावाला तिच्या घरी बोलावले, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे दोघांमध्ये अडथळे निर्माण होत होते. एके दिवशी यमुनेचे आमंत्रण यमदेवतेने स्वीकारले आणि बहिणीला भेटण्याचा निर्णय घेतला. ते बहिणीच्या घरी पोहोचताच खूप खूश झाले. ज्या दिवशी त्यांची भेट झाली त्या दिवशी कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया तिथी होती. तेव्हा सुर्यापुत्री यमुना देवीने भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याचे स्वागत केले आणि खास पक्वान्नांचा बेत आखला. आणि यमदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी बहिणीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना देवीने हा वर मागितला कि, जेव्हा एखादी बहीण तिच्या भावाच्या कपाळी टिळा लावून त्याच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करेल तेव्हा तुमच्या आशीर्वादाने तिच्या भावाला दीर्घायुष्य लाभो. तेव्हापासून भाऊबीज सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.