भारतात दिवाळी हा सण प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या पूर्वी महिला वर्गात घराची साफसफाई केली जाते. त्यानंतर महिला वर्गात फराळ बनवण्याची तयारी सुरु होते. घरातील पडद्यांपासून ते फर्निचर पर्यंत सर्वच गोष्टी स्वच्छ केल्या जातात. आणि महत्वाचं म्हणजे सर्वात शेवटी वेळ येते देवघर साफ करण्याची. परंतु बऱ्याचदा शेवटी देवघर साफ करताना वेळेअभावी देवी देवतांच्या फोटो फ्रेमची नीटनेटकी सफाई केली जात नाही. बऱ्याचदा काचेवर धूळ राहून जाते. त्यामुळे घर स्वच्छ असूनही देवघर मात्र स्वच्छ वाटत नाही. अशा वेळी तुम्ही काही टिप्स आणि ट्रिक्सच्या माध्यमातून देवघर साफ करू शकतात.
1. धूळ साफ करण्यासाठी मायक्रो फायबर कापडाचा वापर
सर्वात अगोदर देवी देवतांच्या फ्रेम वर जमा झालेली धूळ स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचाह वापर करा. कारण हे कापड धूळ शोषून घेण्यास मदत करते. आणि यामुळे धूळ सोप्या पद्धतीने साफ होते. आणि काचेवर कोणतेही परिणाम दिसून येत नाही. परंतु फ्रेम वरील धूळ साफ करत असताना ती जोर देऊन साफ करू नका.
2. व्हिनेगर मिश्रणाचा वापर
देव घरातील फोटो फ्रेमवर तेल किंवा धुराचे डाग असतील तर एक वाटी पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिक्स करा. आणि हे मिश्रण कापडाच्या मदतीने स्वच्छ करा. परंतु फ्रेमच्या साईडला असलेल्या कडा लाकडी किंवा धातूच्या असतील तर त्या साफ करण्यासाठी पाण्याचा वापर करू नका.
हे हि वाचा : दिवाळीची साफसफाई करण्यासाठी आता घरच्याघरी बनवा DIY क्लिनर लिक्विड, ‘हे’ आहेत 5 बेस्ट ऑप्शन
3. ब्रश आणि कापूस
देवांच्या फ्रेम वर कोपऱ्यात बऱ्याचदा धूळ किंवा घाण अडकून राहते. त्यासाठी जुन्या ब्रशचा आणि कापसाच्या गोळ्याचा वापर करा. जेणेकरून कानेकोपरे देखील साफ होतील.
4. लाकडी फ्रेमसाठी रामबाण उपाय
देवघरात लाकडी फ्रेम असेल तर त्यावर लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून कापसाच्या गोळ्याने लावा. यामुळे लाकडी फ्रेमला सुंदर अशी चमक येईल.
हे हि वाचा : घरामध्ये चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी लाभते, जाणून घ्या काय काय होतात फायदे
5. पितळाचे देव क्लीन करण्यासाठी पितांबरी उपयुक्त
तुमच्या देव घरात असलेले पितळाचे देव क्लीन करण्यासाठी पीतांबरीचा वापर करा. जेणेकरून पितळेच्या देवांवर असलॆले कुंकवाचे डाग निघून जातील. आणि देवांना चमक येईल.