काही दिवसांवर दिवाळी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या घरात साफसफाई करणे सुरु झाले असेल. कारण या सणाच्या काळात आपल्या घरी लक्ष्मी माताचे आगमन होत असते. साफसफाई, स्वच्छता असलेल्या घरातच लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घराची साफसफाई करणे फार गरजेचे आहे. त्यानुसार आज आपल्या लेखात साफसफाई लवकर करण्यासाठीच्या ट्रिक्स पाहणार आहोत.
दिवाळी हा दिव्याचा सण प्रत्येकांच्या घरात आनंद आणि उत्साह आणतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजवल्या जातात. आकाशकंदील, दिवे, खाद्य पदार्थ, गिफ्ट्स यासारख्या सर्व गोष्टीने बाजारपेठ सजलेल्या असतात. अशातच प्रत्येकाच्या घरात दिवाळी फराळ बनवण्याची तयारी लागभग दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वी सुरु होते. त्यापूर्वी घराची साफसफाई करण्यात येते. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घराचा प्रत्येक काना कोपरा स्वच्छ केला जातो. या काळात स्वयंपाकघरातील चिकट झालेल्या भिंती पासून बाथरूममधील डाग आणि खिडक्यांवर साचलेली घाण साफ करणे इथं पर्यंत संपूर्ण कामे जोमात केली जातात. हे चिकट डाग काढणे फार कठीण आणि वेळ खाऊ आहे. या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्ही DIY क्लीनर लिक्विड तयार करू शकतात. जेणेकरून कमी वेळातच पूर्ण घराचा कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी मदत होईल.
खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी वापरा हे लिक्विड
आपल्या घरातील दरवाजे, खिडक्या यांची काच स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटल मध्ये दोन चमचे पांढरा व्हिनेगर, दोन कप कोमट पाणी आणि एक चमचा कॉर्नस्टार्च आणि एक कप रबिंग अल्कोहोल हे सर्व मिक्स करा हे मिक्स्चर तुम्ही काचांवर वापरले तर काही क्षणात हे डाग सहज क्लीन करण्यास मदत होईल
स्वयंपाकघरातील चिकट डाग काढण्यासाठी वापरा ही ट्रेक
आपल्या घरातील स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवताना भिंतीवर पदार्थांचे शिंतोडे उडतात. ते डाग कोरडे झाल्यावर साफ करणे अशक्य होते. ते प्रचंड चिकट असल्यामुळे साफ करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अशावेळी घरगुती क्लिनर तयार करा. त्यासाठी दोन कप पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा कॅस्टिल साबण मिक्स करून क्लिनर बनवा. यामुळे भिंतींवरील तेलकट डाग देखील दूर होण्यास मदत होईल.
स्वयंपाकघरातील उपकरणे स्वच्छ करण्यासाठी उपाय
स्वयंपाकघरातील भिंती आणि फरशीवर तेलकट डाग प्रचंड असतात आणि बऱ्याचदा भांडी देखील तेलकट होतात. तर यावेळी भिंती आणि फरशी स्वच्छ करण्यासाठी, चार कप कोमट पाणी घ्या, 1/4 कप डिशवॉशिंग लिक्विड साबण आणि 1/4 कप बेकिंग सोडा मिक्स करून क्लिनर तयार करा. याचा वापर सिंक, रेफ्रिजरेटर, स्टीलची भांडी, स्वयंपाकघराचा ओटा आणि इतर स्वयंपाकघरातील उपकरणे स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो.
तांबे आणि पितळासाठी क्लिनर
दिवाळीमध्ये तांब्याचे आणि पितळेचे भांडे पूजेसाठी काढली जातात. अशा वेळी ती बरीच महिने न घासल्याने आणि पडून राहिल्याने खराब होतात. अशावेळी या भांड्यावर आलेला काळा थर स्वच्छ करून भांडे चमकवणे अति मेहनतीचे काम असते. अशा वेळी लिंबाच्या रसात मीठ मिक्स करून हे लिक्विड भांड्यांना लावा आणि 5-6 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्क्रबरने घास. यामुळे भांडी नव्यासारखी चमकदार दिसतील आणि वेळही कमी लागेल.