दिवाळी हा दिव्यांचा सण आनंद ऐक्य आणणार सण आहे. या दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते. प्रत्येकाच्या घरात फराळाचा सुगंध, नात्यांचा गोडवा दरवडतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसते. संपूर्ण घराची सजावट, रांगोळी आणि मग पारंपारिक पोशाख परिधान कडून फटाके फोडले जातात. आणि दिवाळीचं संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार होते. हा फक्त आनंदाचा सण नसून सुख समृद्धी आणि एका नवीन पर्वाची सुरुवात आहे.
दिवाळी या सणाला दिवे लावण्यामागे खास कारण आहे, ते म्हणजे अंधाराचा पराजय करून नवीन तेजाने नवीन प्रकाशाने चांगुलपणाचा मार्ग निवडणे. म्हणजेच अंधाराला मागे टाकत प्रकाशाकडे वाटचाल करा. आणि सतत त्या दिव्यासारखे तेवत राहा. यंदाच्या दिवाळीत आपण एक संकल्प करूया स्वतसाठीच नाही तर इतरांसाठी देखील काही तरी चांगलं करण्याचा निर्धार करूया. एखाद्या गरजू कुटुंबाला मदत करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करत निसर्गाचे रक्षण करूया.
यंदाच्या दिवाळीत तुमच्या प्रिय व्यक्तींना प्रियजनांना हे पुढील खास संदेश पाठवू शकतात
दिव्यांचा प्रकाश जसा अंधार दूर करतो,
तसंच प्रेम आणि आनंद जीवनात भरतो.
सुख-समृद्धीचा मार्ग तुमच्याकडे उजळो,
दिवाळी साजरी करा आनंदात भरभराट!
फटाके फोडा, आनंद साजरा करा,
नात्यांमध्ये गोडवा कायम ठेवा.
दिव्यांची उजळणी तुमच्या जीवनात होवो,
प्रेम, सुख, यश घेऊन दिवाळी येवो!
आकाश कंदिलांनी रंगून जाओ,
मातीचे दिवे तेजाने भरून जाओ.
प्रगती आणि समाधान तुमच्या आयुष्यात येवो,
दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा होवो!
दिव्यांच्या प्रकाशाने जीवन उजळो,
सर्व अंधकार दूर होवो.
सुख, समृद्धी आणि प्रेम वाढो,
दिवाळी आनंदात साजरी होवो!
हेही वाचा :Dhanteras 2025: जाणून घ्या धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त; अशा पद्धतीने करा धनत्रयोदशीची पूजा
फुलबाज्या, कंदील आणि गोड फराळ,
साजरा करा आनंदाचा उत्सव सगळा.
मनात प्रेम आणि हसू राहो,
दिवाळीने जीवन प्रकाशमान होवो!
नवीन उमेद, नवी आशा घेऊन येवो सण,
जुन्या दुःखाला मागे सोडून जा.
प्रेमाने भरलेले जीवन लाभो सर्वांना,
दिवाळीचा सण आनंदात साजरा होवो!
View this post on Instagram
सुख, समाधान आणि प्रगतीचा दीप जळो,
सर्व घरं आनंदाने भरून जाओ.
प्रेम आणि आपुलकीची भेट असो,
दिवाळीचं प्रत्येक क्षण सुंदर होवो!
दिव्यांच्या तेजाने नवा मार्ग दाखवो,
अंधाराच्या छायेला मागे सोडो.
आनंद आणि यश तुमच्या जीवनात राहो,
दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना!