Expired Beer Health Risk : काही दिवसांपूर्वी कफ सिरप पिल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता मुदत संपलेली बियर पिल्यामुळे एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याचे माहिती समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम येथे घडली असून बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच कल्याण येथील उत्पादन शुल्क विभागाने संबंधित बियर शॉप मध्ये असलेला मुदत संपलेल्या बियरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा परिसरातीळ रहिवासी असलेले अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रेम आटो परिसरातील ‘रियल बिअर शॉप’ या ठिकाणावरून दोन बिअरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्यांनी घरी गेल्यानंतर बिअरचे सेवन केले आणि त्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना त्वरित कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले, या रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.
हे हि वाचा : केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आवळा आणि कोरफड; जाणून घ्या दोघांपैकी कोणता आहे फायदेशीर
अजय म्हात्रे यांच्या काही मित्रांनी रियल बिअर शॉपमध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांच्या दुकानात बऱ्याच प्रमाणात मुदत संपलेली बिअर असल्याचे आढळले. याबाबत संपूर्ण माहिती मिळताच त्यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी ही माहिती उत्पादन शुल्क विभागाला कळवली त्यानंतर या बिअर शॉपमध्ये उत्पादन शुल्क विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. (Expired Beer Health Risk)






