affordable glass screen protector : सध्या कोरियन स्किन केअरचे तरुणाईंमध्ये प्रचंड क्रेज बघायला मिळते. खासकरून तरुणाईंमध्ये कोरियन महिलांची त्वचा हा चर्चेचा विषय आहे. याला कारण म्हणजे काय तर त्यांची नितळ आणि चमकदार अशी सुंदर त्वचा. अशीच त्वचा आपली पण असायला हवी असं भारतीय तरुणाईनं वाटतं. आणि यामुळे ते अजमावत असलेली कोरियन स्क्रीन केअर, क्लिंजिंग मेथड, ते वापरत असलेले प्रोडक्ट्स हे सर्वकाही महिला किंवा तरुणाई वापरतात. तुम्हाला देखील अशी त्वचा हवी असेल तर नक्कीच या ट्रीक्सचा वापर करा. ते कसं हे या लेखातून बघूया.
डबल क्लिंजिंग पद्धत
कोरियन त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही डबल क्लिंजिंग पद्धतीचा वापर करू शकतात. त्यासाठी महत्वाचा नियम म्हणजे 4-2-4. यासाठी तुम्हाला महागडी ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्याची गरज नसून नैसर्गिक पद्धतीने तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करू शकतात. ही पद्धत आजमावण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ लागेल. त्यापैकी 4 मिनिटांमध्ये ऑइल क्लिन्जर चा वापर करून मसाज केली जाते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप आणि जास्तीचे तेल विरघळते. यानंतर 2 मिनिट फोम किंवा जेल क्लींजरने पुन्हा एकदा चेहरा क्लीन केला जातो. आणि शेवटचे 4 मिनिटात चेहरा धुवून स्वच्छ केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास फायदा होतो. तर त्वचा खोलवर स्वच्छ होते.
हे ही वाचा : मकर संक्रांतीला का म्हणतात ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ जाणून घ्या तिळगुळाचे महत्व
चेहरा पूर्णपणे क्लीन होईल
जर तुम्ही रोज सनस्क्रीन आणि प्रदूषणाचा सामना करत असाल तर तुमच्यासाठी आणि त्वचेसाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी मानली जाते. यासाठी तुम्हाला कोणत्याही पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी 4-2-4 या पद्धतीचा वापर करून ग्लास स्क्रीन मिळवू शकतात. या पद्धतीचा तुम्ही योग्य वापर केल्यास चेहऱ्यावरील घाण पूर्णपणे निघून जाईल.






