Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • घरातील धनसंपत्ती वाढवण्यासाठी ‘या’ दिशेला लावा केळीचे झाड
Top News

घरातील धनसंपत्ती वाढवण्यासाठी ‘या’ दिशेला लावा केळीचे झाड

Banana plant placed near a home with a ‘Home Sweet Home’ board, symbolizing prosperity and positive energy

Banana plant for household wealth : हिंदू संस्कृतीमध्ये काही वनस्पतींना व झाडांना खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, कोणतं झाड कुठ लावाव याला अनन्य साधारण महत्त्व आहे. केळीचे झाड हे या शुभ आणि पवित्र वनस्पतींपैकी एक आहे. भगवान विष्णू केळीच्या झाडावर वास करतात. घराच्या आसपास केळीचे झाड असल्यास ते समृद्धी, शांती आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे. गुरुवारी केळीची पूजा करणे शुभ मानले जाते. कारण गुरूवार हा भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पति यांना समर्पित आहे. तर तुम्हालाही तुमच्या घराच्या आसपास केळीचं झाडं लावायचे असेल तर त्यासाठी योग्य दिशा कोणती आहे ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

धार्मिक समारंभांमध्ये अनेक मंदिरं आणि घरं सजवण्यासाठी केळीचे खाबं तसेच पानांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. केळीच्या झाडाला शुभतेचे प्रतीक मानले जाते म्हणून शुभ प्रसंगी केळीच्या झाडांचा वापर केला जातो. केळीच्या झाडाला जीवनात स्थिरतेचे प्रतीक देखील मानले जाते. त्याचे मजबूत खोड आणि मोठी पाने जतन आणि विस्तार दर्शवतात.

हे ही वाचा : मंगळसूत्रात काळे मणी का असतात ? जाणून घ्या किती असते मंगळसूत्रात ताकत

वास्तुशास्त्रात घराच्या अंगणात ईशान्य दिशेला केळीचे एक छोटं रोप लावण्याची शिफारस केली आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कौटुंबिक जीवन आनंदी होते. असे मानले जाते की जिथे हे केळीची झाड बहरते त्या घरात संपत्ती आणि समृद्धी भरपूर प्रमाणात असते. या दिशेला केळीचे झाड लावल्याने घरात शांती, यश आणि सौभाग्य येते. याशिवाय केळीचे झाडं घराच्या समोर लावता येत नाही. घराच्या मागील बाजूस केळीचे झाडं लावणे शुभ मानले जाते. या वास्तु नियमाचे पालन केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठी राहतो.

धार्मिक कथांनुसार

वास्तुनुसार काही रोपांची व झाडांची शक्ती घराच्या वातावरणावर थेट परिणाम करते, म्हणूनच घराच्या अंगणात केळीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार केळीच्या झाडाची पूजा केल्याने घरात लक्ष्मी येते. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी, हळद आणि कुंकू अर्पण केल्याने आणि दिवा लावल्याने कुटुंबाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. ग्रहांचे अडथळे दूर होतात.

(टिप – वरील लेख केवळ माहितीसाठी आहे, आम्ही यातील कोणताही दावा करत नाहीत..)

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना साजूक तूप: आरोग्याचं अमृत, रोजच्या आहारातली सुवर्णकिल्ली!